मालाड, ता.1(निसार अली) : 1मे या महाराष्ट्रदिनानिमित्त युवा जनता दल सेक्युलर मुंबई तर्फे पोलिसांसाठी सॅनिटायझर आणि मास्क वितरण उपक्रम राबावण्यात आला. चारकोप पोलीस ठाणे आणि बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाणे येथे वितरण करण्यात आले. यावेळी मुंबई अध्यक्ष केतन कदम, किरण बागुल, ॲड. आदित्य साळवे, आकाश निकाळजे ॲड. प्रशांत जाधव, सुधीर जाधव उपस्थित होते.