रत्नागिरी : राज्यात सध्या शिवसेना-भाजप युती बाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. युतीसाठी एकीकडे भाजपही आग्रही आहे. तर युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरीत आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेना आणि भाजप युतीसाठीचा प्रयत्न कायम सुरु आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून भाजपच्या नेत्यांपर्यत सर्वांना युती व्हावी असं वाटत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली आहे. तर युतीबाबतचा निर्णय राज्य आणि केंद्र पातळीवर घेतला जाईल.. मात्र अजून आम्हाला युतीबाबत कोणतेही निर्देश आले नसल्याचं लाड यांनी म्हटलं आहे.