डोंबिवली, (प्रशांत जोशी) : युग फाउंडेशन तर्फे मोफत नेत्रचिकित्सा-चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन पश्चिम येथील जयहिंद कॉलनीतील साव्य हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. अंबर आय केअरने या शिबिरासाठी वैद्यकीय सहाय्य केले.
या शिबिराचे उदघाटन युग फाउंडेशनच्या अध्यक्ष कल्पना किरतकर यांच्या हस्ते झाले. यावेली बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर, डॉ रश्मी धाईजे, तृष्णा वाघमारे, युंगधर किरतकर, पराग वाघमारे, अक्षय मोहिते, प्रितम वाघमारे तसेच अंबर आय केअरचा वैद्यकीय कर्मचारीवृंद उपस्थित होता.
नेत्रसमस्या व नेत्रचिकित्सा याचे महत्व विषद करताना कल्पना किरतकर म्हणाल्या की, युग फाउंडेशनच्या वतीने आजपर्यत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. याचा लाभ समाजातील गरिब वंचित लोकांना घेता येतो. अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपता येते. डोंबिवलीसारख्या शहरात प्रदूषण वाढीला लागले आहे त्यामुळे डोळ्यांचे विकार वाढीला लागले आहेत. मोबाइल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. लहान मुलांपासून ते जेष्ठांना पर्यत मोबाईल अॅडिक्टने ग्रासले आहे. या मोबाईल-कंप्यूटरमुळे सुध्दा डोळ्यावर परिणाम होत आहे. याचा विचार करुन या शिबिराचे आयोजन केले आहे. वाढत्या वयामुले व डायबिटीज सारख्या असाध्य रोगामुळे नेत्रांवर परिणाम होउन मोतीबिंदूसारखे प्रकार दिसून येतात. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहेत.
सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यत सुरु असलेल्या या शिबिरात सुमारे तीनशे रुग्णानी शिबिराचा लाभ घेतला. अंबर आय केअरच्या शंतनु, फरहिन, सिद्धेश, किरण, प्रियंका, प्रिया, बिजल, यांनी या शिरासाठी मोलाचे सहाय्य केले.