नवी दिल्ली : पाकिस्तानने वर्ष 2015 मध्ये भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर 152 वेळा तर आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर 253 वेळा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले. 2016 मध्ये नियंत्रण रेषेवर 228 वेळा तर आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर 221 वेळा उल्लंघन केले.
युद्धबंदी कराराच्या उल्लंघनात वर्ष 2015 मध्ये लष्कराचे 6 तर वर्ष 2016 मध्ये 8 जवान शहीद झाले. 2015 मध्ये सीमा सुरक्षा दलाचे 4 तर 2016 मध्ये 5 जवान शहीद झाले. यात 2015 मध्ये 16 तर 2016 मध्ये 13 नागरिक शहीद झाले. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 2014 मध्ये 27, 2015 मध्ये 27 तर 2016 मध्ये 49 जवान शहीद झाले.
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.