मुंबई,(निसार अली): मालवणी क्रमांक सात मधील आझमी नगर येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाने घरातील माळ्यावर गळफास लावून आत्महत्या केली.
अब्दुल रहमान रफीउल्लाह खान असे त्याचे नाव असून तो व्यवसायाने सुतार होता. सोमवारी दिनांक 18 डिसेंबर ला रात्री कामावरून आल्यानंतर जेवण आटोपून रात्री 9 च्या सुमारास घराच्या माळ्यावर अब्दुल झोपायला गेला होता. सकाळी 9 वाजेपर्यंत त्याने दार उघडलं नाही म्हणून घरच्यांनी हाक मारली. तरीही त्याने उत्तर दिले नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला. यावेळी अब्दूलने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत मालवणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली. मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.