मुंबई, (निसार आली) : मालवणीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेश मसुरकर यांच्या आई मीना यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६५ वर्षांच्या होया. त्यांच्या पश्चात पती दुर्गानंद मसुरकर ,एक मुलगा आणि एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
मीना मसुरकर यांची अंत्ययात्रा गुरुवारी ११ मे रोजी साने गुरूजी वसाहत, मालवणी क्रमांक २ येथील राहत्या घरातून सकाळी ११ वाजता निघणार आहे. मालवणी येथील हिन्दू स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.