
मुंबई, (निसार अली) : भारतीय नौदलाचे 600 जवान , अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मालाड पश्चिमेतील आयएनएस हमला या प्रशिक्षण केंद्रात योग दिन उत्साहात साजरा केला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून नौदलाच्या जवानांनी तीन दिवसांपासून योग सराव सुरू केले होते. जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच मानसिक व शारीरिक स्वास्थ्य ठीक राहावे हा यामागील उद्देश होता. तीन दिवसीय योग कार्यक्रमात जवानांसह अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्साहात भाग घेतला, अशी माहिती भारतीय नौदलाचे लेफ़्टनंट बी.एस. यादव यांनी दिली.
















