
डोंबिवली : योग दिनानिमित्त डोंबिवली पश्चिम येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा बेडसे यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून अंबिका योग निकेतन ठाणे या संस्थेचे योगशिक्षक यांना आमंत्रित केले होते. या योगसाधकाने विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व सांगितले. यानंतर प्रार्थना, शांतीपाठ, प्राणायाम योगासने व सूर्यनमस्कार असे योगातील वैविध्यपूर्ण प्रकारांच्या योगासनांचे सादरीकरण शाळेतील सुमारे नऊशे विद्यार्थी व शिक्षकांनी केले.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिकच्या इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांची योगासने, पूरक हालचाली, सूर्यनमस्कार या प्रकारांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदेसर यांनी “योग” विषयाची माहिती देऊन केले. प्रात्यक्षिके क्रीडा शिक्षक हिवाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यामध्ये सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, बद्धपद्मासन, गोमुखासन ,वज्रासन अशी विविध आसने घेण्यात आली.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना उभे करून योग प्रार्थना, पूरक हालचाली, प्रात्यक्षिके, आसने शाळेतील क्रीडा शिक्षक बागल सर, दळवी सर यांनी करून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवश्री इनामदार व नंदन कार्लेकर या विद्यार्थ्यांनी केले.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका नाईक मॅडम, पर्यवेक्षिका कुलकर्णी मॅडम संस्था सदस्य शास्त्री सर, इनामदार सर उपस्थित होते. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक शाळेत योगदिन साजरा केला.
भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ तर्फे योग शिबिराचे आयोजन :
भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळाच्या अध्यक्षा रसिका पाटील यांच्या माध्यमातून जागतिक योग दिनाचे औतिच्य साधून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या कार्यकर्त्या सुरेखा जाधव, निर्मला मानकर, राधिका पाटील, करिष्मा प्रताप, ऋतिका बेलोसे, सुशीला जोशी, अनुजा गायकवाड आदी महिला कार्यकर्त्यांसह सुमारे 43 लोक उपस्थित होते. योगा शिक्षक पूनम चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास झाला.

















