रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात योगदिनी विद्यार्थ्यांनी योग व प्राणायाम केला आणि सूर्यनमस्कारही घातले. इयत्ता चौथीतील 150 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
लहान वयापासूनच विद्यार्थ्यांची तब्बेत ठणठणीत राहावी, याकरिता पहिली ते चौथीच्या एकूण 12 तुकड्यांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना योगाचे धडे दिले जातात. शाळेच्या योगा शिक्षिका स्वाती मलुष्टे या खूप मेहनत घेतात. त्या विद्यार्थ्यांना योग, प्राणायामाचे धडे वर्षभर देतात. आगाशे विद्यामंदिरच्या नाटेकर सभागृहात चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनी विद्यार्थ्यांनी आसने केली. यामध्ये आकर्णधनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन, गोमुखासन, वृक्षासन, उष्ट्रासन या आसनांचा समावेश होता. तसेच विद्यार्थ्यांनी सुरवातीला सूर्यनमस्कार घातले. मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.