रत्नागिरी : आपली आत्मशक्ती ओळखण्याचे साधन म्हणजे योग आहे, योग साधनेतून आपण स्वत:च्या क्षमता ओळखून त्याचा विकास करु या असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात केले.
रत्नागिरी येथील माळ नाका भागात असणाऱ्या भागीरथी हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पतंजली योग पीठ यांच्या संयुक्त आयोजनात हा सोहळा होता. यात रत्नागिरीवासीयांनी चांगला सहभाग नोंदविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एक संकल्पना दिली आहे. सन २०१४ मध्ये योगासाठी संयुक्त राष्ट्र संघामध्ये त्यांनी भाषण केले आणि जुन २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरु करण्यात आला. आपण धकाधकीच्या जीवनामध्ये काम करीत असताना वेगवेगळया जीवनशैल्ली जगत असतो. हे सर्व करीत असताना आपलं मन आणि शरीर एकत्र ठेवण्याचे काम योगाच्या माध्यमातून होत असतं. योग हा काही व्यायाम नसून तर तो स्वत: मधील क्षमता ओळखण्यांची प्रक्रिया असे आपल्याला वाटते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण आपल्यामधील क्षमता जागी करु आणि नियमित योगा करुन आरोग्यसंपन्न राहू या असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
यावेळी शिर्के हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी योग गीत सादर केले. राज्यस्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी योगासनांची प्रात्यक्षीक दाखविले. आंतरराष्ट्रीय योग पटू पूर्वा केंद्रे यांनी यावेळी योगासनांचे प्रात्यक्षित दाखविले. यावेळीपंतजली योग समिती, रत्नागिरीचे अध्यक्ष ॲङ विद्यानंद जोग यांनी उपस्थित मान्यवरांना योगांचे धडे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मैदान, विवेक हॉटेल हॉल, माळनाका, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. रत्नागिरी आर.के. बामणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, कंचन चव्हाण, पतजंली योग समिती, राज्य कार्यकारणीच्या सदस्या रमाताई जोग, पंतजली योग समिती, रत्नागिरीचे अध्यक्ष ॲङ विद्यानंद जोग जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, जिल्हा परिषद, रत्नागिरीचे आयरे, वैद्य अक्षता सप्रे, आनंद आगाशे आदि योगप्रेमी तसेच गोगटे जोगळेकर विद्यालयातील आणि रा.भा. शिर्के हायस्कूलचे तसेच आदि विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थ्यानी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समारोप जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दीक्षीत यांनी केले