रत्नागिरी, 4 मे : सीईटीच्या परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभागाला घ्याव्याच लागतील आणि याच परीक्षांसंदर्भातील अंतिम बैठक मंगळवारी (उद्या) व्हीसीद्वारे होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.. ते आज संध्याकाळी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री उदय सामंत आणि सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे. त्यानंतर बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडे दिला जाणार आहे. आणि येत्या दोन दिवसांमध्ये परीक्षांचं टाईम टेबल काय असेल, परीक्षा कधी होणार आहेत, कुठची परीक्षा कधी होणार, सीईटीची परीक्षा कधी असेल. हे सर्व युजीसीच्या गाईड लाईन्स प्रमाणे आम्ही फायनल करू, आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.