मुंबई : गेल्या काही काळात सोन्याचा भाव वेगाने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गोल्ड फ्यूचर $1460/oz च्या (१६ मार्च २०२० रोजी ) निर्देशांकावरून $1750/oz (१६ एप्रिल २०२० रोजी) च्या आसपास पोहोचला. ही जवळपास २० टक्क्यांची वृद्धी आहे. एमसीएक्सवर १६ मार्च २०२० रोजी गोल्ड फ्यूचर 38400/10 ग्रामच्या खालील पातळीवर होते. १६ एप्रिल रोजी ते वाढून ४७,००० अंकांच्या पुढे गेले. यात सुमारे २२ टक्क्यांची वृद्धी दिसून आली.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले की पिवळ्या धातूतील वृद्धी म्हणजे गुंतवणूकदारांना जगात होणा-या प्रत्येक धातूच्या तुकड्याची महत्वाकांक्षा असते, याचे स्पष्ट संकेत आहेत. मात्र भौतिक रुपात ते असे करू शकत नाही. पण फ्यूचर ट्रेंडिंग/ इन्व्हेस्टमेंटद्वारे ते ही क्रिया करतात. अनिश्चिततेच्या वेळी सुरक्षित मार्गाची निवड करावी लागल्याने गुंतवणूकदार हैराण आहेत. सुरक्षित झेप आणि गुंतवणुकीच्या शोधात तो पिवळ्या धातूकडे पहात आहेत.
अशा प्रकारच्या अनिश्चित काळात गुंतवणूक पिवळ्या धातूकडेच कलणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती $१८५०/ औंसपर्यंत वाढू शकतात. तर एमसीएक्स फ्यूचर्समध्ये सोन्याच्या किंमती ५० हजार रुपये/१० ग्रामच्या निर्देशांकाकडे वाढू शकतात. बाजार लवकरच ही उंची गाठेल, अशी अपेक्षा आहे.