डोंबिवली : प.पू. गुरूजी श्री अरविंदनाथजींनी यांनी ०२/०९/१९८८ रोजी “ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठान, डोंबिवली” संस्थेची स्थापना “भगवान श्रीकृष्ण व ज्ञाननाथ जयंती म्हणजेच जन्माष्टमी दिवशी केली होती.
प.पू. गुरूजी श्री अरविंदनाथजींचे दि. २ ऑगस्ट, २०१७ रोजी देहावसान झाले. प्रतिष्ठान तर्फे जन्माष्टमी निमित्त दि. १५ ऑगस्ट, २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता “निष्काम यज्ञ” सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा यज्ञ सोहळा प. पू. गुरूजी श्री अरविंदनाथजीनां सद्गती देण्यासाठी नसून परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांना गुरूजींनी अनुसरलेल्या कार्य पद्धतींच्या बारकाव्यांचा, शिष्यांना निष्कपट अन् निरलस आध्यात्मिकतेचा तर परिचितांना त्यांच्या अलौकीकत्वाच्या आठवणींचा पुन:प्रत्यय देईल असे समस्त प्रतिष्ठान परिवाराला वाटत आहे. सदर सोहळा नव श्री संकल्प सोसायटी, नांदिवली टेकडी-रोड, विद्यासागर शाळेजवळ, डोंबिवली (पू) येथे होणार असून या सोहळ्यास प्रतिष्ठान परिवाराने अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.