मुंबई : वरळी कोळीवाडा येथील कोरोनाग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात म्हणून मुंबईतील श्री गुसाइनजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामीण प्रगती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील 15 दिवस पुरेल एवढे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.
श्री गुसाइनजी चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक सहकार्यातून ग्रामीण प्रगती फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली.
यामध्ये प्रत्येकी 5 किलो तांदूळ, गहू, तेल, साखर, चहापावडर, मीठ, तूरडाळ, मूगडाळ तसेच साबण इत्यादी सामग्रीचे 1000 पॅकेट्स वाटप करण्यात आली.
कोळीवाडा रहिवाशी संघाचे मुख्य समन्वयक सुधीर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्ससिंग नियमांचे पालन करून अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती ग्रामीण प्रगती फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश डफळे यांनी दिली आहे.