मुंबई, (निसार अली) : वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी पारंपरिक वस्त्र परिधान करून नृत्य आणि कोळी गाणे गात उत्साहाने नारळी पौर्णिमा साजरी केली. यावेळी वरळी समुद्रात नारळ अर्पण करून पूजा करण्यात आली.
पावसाळा सुरू झाल्यावर मासेमारी बंद करून पौर्णिमा साजरी करताना पुन्हा मासेमारी सुरू होण्याच्या आनंद कोळी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसत होता. काँग्रेस फिशरमेन सेलचे संकेत रामचंद्र कोळी, दक्षिण मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा सुरेखा पाटील, मनोज वरळीकर आणि चेतन तिगडी आदी मान्यवर उपस्थित होते.