
लंडन : रोमहर्षक ठरलेल्या अंतिम सामन्यात क्रिकेटच्या विश्वचषकावर अखेर इंग्लंड ने नाव कोरले. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा इंग्लंडने पराभव केला. अंतिम चेंडूपर्यंत डाव रंगला. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर खेळविण्यात आली. येथेही सामना बरोबरीत सुटला. परंतु नियमाप्रमाणे जो संघ सामन्यात सर्वाधीक चौकार लगावतो, तो विजयी होतो, त्या प्रमाणे इंग्लंड विजयी ठरला. इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदाच विश्वकप जिंकला तर न्यूझीलंड उपविजेता ठरला.
इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान न्यूझीलंडने दिले होते. यासाठी इंग्लंडने शेवटपर्यंत धावांचा पाठलाग केला. २४१ धावांवर इंग्लंडचा संघ गारद झाल्याने सामना बरोबरीत सुटला. यामुळे अंतिम सामन्यात पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा प्रयोग झाला. या ओव्हरसाठी इंग्लंडला प्रथम फ़लंदाजी मिळाली. त्यांनी १५ धावा केल्या. न्यूझीलंडनेही १५ धावा केल्या. परंतु नियमाप्रमाणे इंग्लंड विजयी ठरला.
















