
रत्नागिरीत एसटी वर्कशॉपच्या
भंगाराला लागलेली आग
रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीत एसटी वर्कशॉपच्या भंगार गोडाऊनला शुक्रवारी भीषण आग लागली. याआगीत लाखोंचं भंगार जळून खाक झाले. विशेष म्हणजे या भगारांचा लिलावाच्याच दिवशी आग लागल्याने संशयाचा धूर पसरला आहे.
रत्नागिरीतल्या टीआरपी परिसरातमध्ये एसटीचं मोठं वर्कशाॅपमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार आहे. या भंगाराचा आज लिलाव होणार होता. हा लिलाव ऑनलाईन सुरु होता. मात्र ऑनलाईन लिलाव प्रक्रिया सुरु असतानाच दुपारी १ ते दीडच्या सुमारास आग लागली. एसटीच्या सीट्स, पत्रा तसेच प्लास्टिकचे बॅरल, अॅल्युमिनिअम आणि एसटीच्या कुशन सीटस, लाकडी साहित्य आणि वाऱ्यामुळे आग भडकली. बघता बघता संपूर्ण वर्कशॉपला आगीने वेढले. अग्निशमन दलाच्या चार बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण भंगार जळून खाक झाले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, लिलावाच्या दिवशी आग लागल्याने संशय व्यक्त केला जात आहे.















