
मुंबई : व्होकहार्ट रुग्णालय आज कोरोनाच्या विळख्यात सापडले. तब्बल २६ परिचारिका आणि तीन डॉक्टरांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली. मुंबई महापालिकेने हे रुग्णालय सील केले आहे.
रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टर, नर्सेसनाही कोरोना होत असल्याने चिंता वाढली आहे. चाचणी अहवाल निगेटिव्ह येत नाहीत, तोपर्यंत या रुग्णालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले आहे, रुग्णाच्या देखरेखीसाठी आरोग्य विभागाचे पथक सज्ज ठेवले आहेत. संसर्गाचा तपास सुरू आहे.















