बर्लिन: औरंगाबाद येथील वोक्हार्ट ग्लोबल स्कुलची नोव्हेंबर २०१७ मध्ये बर्लिन येथे होणार्या वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टीव्हल च्या अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टीव्हल मध्ये शालेय प्रकारात घेण्यात येणाऱ्या टॉप टेन मानांकनात ७० देशांमधील फक्त १० शाळांची “वर्ल्ड बिल्डिंग ऑफ द ईयर” पुरस्कारासाठी अंतिम फेरीत निवड करण्यात येते. वोक्हार्ट ग्लोबल स्कुल या फेरीत निवड झालेली भारतातील एकमेव शाळा आहे.
विद्यार्थ्यांला जागतिक नागरिक बनविण्याचा मानस केंद्रस्थानी ठेवून बांधलेल्या या शाळेच्या इमारतीला हे मानांकन मिळाले आहे. शाळेची रचना एका प्रशस्त क्षेत्रात करण्यात आली आहे. तलाव आणि निसर्गरम्य कॅम्पसची निर्मिती करण्यात आली आहे. या फेस्टिवलमध्ये शाळेचा समावेश झाल्यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या बिझनेस इनसायडर रिपोर्ट अनुसार वोक्हार्ट ग्लोबल स्कुलला जगातील १६ सर्वांत सुंदर शाळांमध्ये समाविष्ट करण्यात आले असून भारतातील ही अशी एकमेव शाळा आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट ग्लोबल स्कुलच्या संचालिका जहाबिया खोराकीवाला म्हणाल्या , ” शाळेचा जागतिक गौरव आम्हाला शिक्षणाद्वारे जीवनात परिवर्तन घडविण्याच्या आमच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारा हा गौरव असून आम्हाला याचा अभिमान आहे. शाळेचा नैसर्गिक परिसर व आधुनिक तंत्रज्ञान एकत्रित करून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देणे हा या इमारतीच्या डिझाईनमागचा हेतू आहे.”
वोक्हार्ट ग्लोबल स्कुलचे संचालक व मुख्याध्यापक लॉन डब्ल्यू मॅकडॅनियल म्हणाले ,” आमचा कॅम्पस हा पर्यावरणपूरक असून आयबी व सीबीएसई शिक्षणप्रणालीशी सुसंगत आहे. वोक्हार्ट ग्लोबल स्कुलचे ध्येय भारतातील भावी पिढीला विकसित करणे व त्याना अपेक्षित मुल्य,ज्ञान व कौशल्य देऊन जागतिक नागरिक बनविणे असून आमच्या शाळेला मिळालेला हा पुरस्कार भारतात
जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याची आमची कटिबध्दता अधिक दृढ करणारा आहे.”
औरंगाबादमधील वोक्हार्ट ग्लोबल स्कुल ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक व अद्ययावत शाळा असून त्यामध्ये इंटरनॅशनल बॅक्युलरेट व सीबीएसई अभ्यासक्रम चालविला जातो. वोक्हार्ट ग्लोबल स्कुलच्या कॅम्पसचे डिझाईन मुंबई स्थित आर्किटेक्चर कंपनी असलेल्या मांडवीवाला कुतुब अॅन्ड असोसिएट यांच्या तर्फे करण्यात आले आहे. वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टीव्हलमध्ये हा जगामधील एकमेव अंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर फेस्टिवल असून सत्तरहुन अधिक देश यामध्ये भाग घेतात. या फेस्टिवलमध्ये विविध १८ नामांकने असून शाळांच्या इमारतीच्या नामांकनामध्ये भारतातील वोक्हार्ट ग्लोबल स्कुलची निवड झाली आहे.. मुलांच्या आकलन शक्तीला पोषक वातावरण निर्माण करून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण प्रदान करणे तसेच मुलांना जागतिक नागरिक बनविण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून आत्मनिर्भर करणे अशा अनेक बाबींचा विचार करून या शाळेचे आर्किटेक्चर बनविले असून वोक्हार्ट ग्लोबल स्कुल वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टीव्हलमधील निकषाला पात्र ठरली आहे.