तेलाच्या किंमती शून्यापेक्षा कमी दरावर घसरल्या यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. ही अभूतपूर्व स्थिती असून इतिहासात प्रथमच डब्ल्यूटीआय तेलाच्या किंमती (मे कॉन्ट्रॅक्ट) १९० टक्क्यांपेक्षा जास्त दराने घटल्या. मागणी कमी झाल्याने तेलाच्या किंमती शून्याच्याही खाली उतरल्या. कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजारामुळे जगभरात लॉकडाउन असल्याने मागणी घटली आणि तेलाचे उत्पादन होतच राहिले. आता जगभरातील तेलाची साठवण क्षमताच पूर्ण झाली आहे.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले की कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी कोट्यवधी लोक घरात राहत असल्याने अमेरिकेच्या क्रूडची मागणी आटून गेली आहे. तथापि सोमवारी डब्ल्यूटीआय जून फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट अमेरिकेच्या बाजारात २२.२५ डॉलर प्रति बॅरल या दरात होता. मे आणि जूनच्या दरातील प्रसार १९ डॉलरपेक्षा जास्त होता, दोन लगतच्या महिन्यांमधील हा फरक इतिहासात प्रथमच एवढा मोठा दिसून आला आहे.
कच्चे तेल शून्यापेक्षा खाली घसरले याचा अर्थ काय?
मंगळवारी (२० एप्रिल २०२०) गुंतवणूकदारांनी चिंतादायक वातावरणाच्या लाटेत कालबाह्य होणा-या मे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची विक्री केली. एका क्षणाला सोमवारी अमेरिकी बाजारात कॉन्ट्रॅक्टने उणे ४० डॉलर एवढे दर दर्शवले. व्यापार थांबला तेव्हा तेलाच्या किंमतीनी उणे ३७.६३ डॉलर प्रति बॅरल एवढे दर गाठले. ही घट ३०५ % किंवा ५५.९० डॉलर प्रति बॅरल एवढी होती.
असे का घडले?
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाने जगभरातील इंधन मागणीत ३० टक्के घट अनुभवली. तरीही ओपेक संघटनेने तेलाचा पुरवठा सुरूच ठेवला. त्यामुळे अत्याधिक पुरवठा झाला. अनावश्यक तेल साठ्यांमध्ये जात असून अमेरिकेचे साठेही आता अपेक्षेपेक्षा जास्त गतीने भरले आहेत.
तेलपुरवठ्याचे केंद्र असलेल्या कुशिंग, ओकलाहोमामध्ये काय घडले?
अमेरिकेतील मुख्य स्टोरेज हब मागील आठवड्यातच ७० टक्के भरले होते. दोन आठवड्यात हे भरतील, असा ट्रेडर्सचा अंदाज होता. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट फ्युचर्स करारातील तरतूदींमुळे सोमवारी अमेरिकेच्या फ्युचर्स मार्केटमध्ये विक्री वाढली. तेलाचा करार संपला तेव्हा प्रत्येक होल्डरला कुशिंगला वितरित केलेल्या प्रत्येक करारासाठी १००० बॅरल तेलाचा ताबा घ्यावा लागतो. शुक्रवारी काही खरेदीदार होते आणि करार १८ डॉलर या किंमतीवरून शून्यापेक्षा कमी किंमतीवर घसरले.
एकदा ही पातळी गाठल्यानंतर विक्रेत्यांनी त्यावर सारवासारव करून १९८३ मधील वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट करार सुरू केल्यापासून सर्वात वाईट दिवस म्हणून उणे ४० डॉलर प्रति बॅरलवर हा करार केला.
यावर उपाय काय?
जोपर्यंत उत्पादन अधिक वेगाने कमी होत नाही, तोपर्यंत पुढील महिन्या जूनच्या करारासह सोमवारची पुनरावृत्ती होऊ शकते. ती मे करारापेक्षा अधिक २०.४३ डॉलर किंवा ५८ डॉलरपर्यंत जाऊ शकते.