मुंबई, 15 जून : ट्रक मालकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित असलेल्या व्हील्सआय या हायपर ग्रोथ स्टार्सअपने लॉकडाउनच्या काळात अनोळखी ठिकाणी अकडकेल्या बहुतांश ट्रक चालक आणि वाहन मालकांसाठी नॅशनल ट्रक मेंटेनन्स अँड रिपेअर सपोर्ट प्रोग्रामची सुरुवात केली आहे. दुरुस्तीच्या दुकानापासून ते सर्व्हिस सेंटरपर्यंत सर्वकाही शोधणे आणि त्याची माहिती ट्रक चालक आणि मालक यांना उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे. या प्लॅटफॉर्मने ५०० हून अधिक दुरुस्ती दुकाने, २००० पेक्षा जास्त मेकॅनिकशी करार केला आहे. सध्या १५राज्यांत दररोज १०० पेक्षा जास्त केसेस ते सोडवत आहे. व्हील्सआय हा संपूर्ण कार्यक्रम देशभरात विस्तारत आहे.
या प्रोग्राममुळे ट्रकचालक आणि ऑपरेटर्स यांना योग्य मेकॅनिक, डीलर किंवा दुरुस्ती दुकानापर्यंत पोहोचण्यास मदत होते, जे त्यांच्या प्रश्न सोडवण्यास सक्षम आहेत. व्हील्सआय सेवा प्रदात्याशी समन्वय साधत सेवा किंवा स्पेअर पार्ट्सची डिलिव्हरी वेळेत पोहोचण्याची हमी घेते. ही सेवा ८ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
व्हील्सआयचे प्रवक्ते श्री सोनेश जैन म्हणाले, ‘या उपक्रमाद्वारे, आम्ही उत्कृष्ट सेवा दृश्यमानतेसह सर्व स्टेकहोल्डर्सला सक्षम करु इच्छितो. जेणेकरून त्यांचा माल वेळेवर पोहोचण्यास मदत होईल. हे उपाय शोधणा-याला संबंधित समस्या हाताळणा-या योग्य सेवा प्रदात्याशी जोडून देते. त्यामुळे प्रतिसाद खूप सकारात्मक येतो. तसेच आपल्या देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी होईल, तेव्हा त्यात आणखी सुधारणा होईल”