~ २०२२ मधील प्रमुख कामगिरी ~
मुंबई, 22 डिसेंबर २०२२: २०२२ हे वर्ष इतिहासात क्रिप्टो परिसंस्थेसाठी निर्णायक वर्षांपैकी एक गणले जाईल. दरम्यान वझीरएक्सने वार्षिक अहवाल सादर केला असून या अहवालात वर्षभरात घडलेल्या घडामोडींचा समावेश आहे. प्रथमत:च क्रीप्टो खरेदी करणाऱ्यांपैकी २७% ग्राहकांनी वझीरएक्सवर शिब टोकन्स विकत घेतले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ४१ ते ६० या वयोगटातील महिलांनी त्याच वयोगटातील पुरुषांपेक्षा जास्त व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्सची उलाढाल केली आहे.
एलोन मस्कच्या ट्वीटर हस्तांतरणामुळे प्लॅटफॉर्मवरच्या डॉज कॉईनच्या एकूण उलाढालीवर परिणाम झाला असून हस्तांतरण पूर्ण झाल्यावर प्लॅटफॉर्मवरील डॉज कॉईनच्या उलाढालींची पातळी ३०००% नी वाढली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच चिलीझ टोकन (CHZ) या Socios.com या फॅन वोटिंग पोर्टलच्या अधिकृत टोकनने फिफा विश्वचषकापूर्वी खूप मोठी बढत मिळवली.
वापरकर्त्यांच्या वर्तनात दिसून आलेले ठळक मुद्दे:
वझीरएक्स वापरणाऱ्यांच्या संख्येने ३० नोव्हेंबरपर्यंत १० अब्जांचा आकडा गाठला.
या वर्षी २१,२२,९२५ नवीन वापरकर्त्यांनी एक्स्चेंजवर नोंदणी केली.
वझीरएक्स वर प्रामुख्याने उलाढाल बीटीसी, यूएसडीटी, शीब, डब्ल्यूआरएक्स, ईटीएच, टीआरएक्स, डॉज, मॅटिक ह्या टोकन्स मध्ये झाली.
प्रमुख टोकन्सच्या प्लॅटफॉर्मवरील एकूण उलाढालीपैकी सरासरी २०% उलाढाल महिलांनी केली.
४१ ते ६० आणि त्यावरील वयोगटातील महिलांनी त्याच वयोगटातील पुरुषांपेक्षा व्हीडीएमध्ये जास्त उलाढाल केली. एकूण महिला वापरकर्त्यांमध्ये २६ ते ४० या वयोगटातील महिलांचा सर्वाधिक म्हणजे ४६% वाटा होता.
व्हीडीएमध्ये १८ ते ४० वयोगटातील पुरुषांनी इतर वयोगटातील पुरुषांपेक्षा जास्त उलाढाल केली.
महिलांनी अधिकरित्या ब्लु चिप टोकन्समध्ये (ते टोकन्स जे अधिक काळ गुंतवणूकीसाठी म्हणजेच लॉन्ग रन मध्ये अधिक लिक्विडीटी सहित मौल्यवान मानले जातात) उलाढाल केली.
दुसरीकडे, पुरुषांनी ब्लू चिप टोकन्सशिवाय मीम टोकन, गेमिंग टोकन इत्यादींमध्ये देखील गुंतवणूक केली.
२६ ते ४० या वयोगटातील पुरुष आणि महिलांची ईटीएच ही आवडीची टोकन्स होती. एकूण महिलांनी केलेल्या उलढालीतील ४७.४८% उलाढाल नमूद केलेल्या वयोगटातील महिलांनी ईटीएच मध्येच केली. तर समान वयोगटातील पुरुषांनी एकूण पुरुषांनी केलेल्या उलढालीतील ५६.७०% उलाढाल ईटीएच मध्ये केली.
२६ ते ४० वयोगटातील पुरुषांमध्ये ४९% एवढ्या उलाढालीसह तर ४१ ते ६० वयोगटातील महिलांमध्ये ४०% एवढ्या उलाढालीसह बीटीसीने आपली लोकप्रियता राखली.
पश्चिम बंगाल (४२%), हरियाणा (३५%), उत्तर प्रदेश (२५%) आणि कर्नाटक (२१%) या राज्यातून सर्वाधिक महिला क्रिप्टो व्यवहारांत सामील झाल्या.