मुंबई, (निसार अली) : उन्हाचा तडाखा वाढल्याने घराबाहेर कामानिमित्त बाहेर पडणार्या नागरिकांचे हाल होत आहेत. वाटसरूंना दिलासा मिळावा यासाठी युवा शक्ती सेनेने प्लास्टीकच्या आवरणात बंद असणार्या ग्लासमधून पाणीवाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
मार्वेरोड येथे युवा शक्ति सेना वाटसरूंना दिलासा देण्याचे काम करत आहे. पिण्याच्या पाण्याचे थंडगार पाण्याचे ग्लासचे वाटप रिक्षाचालक, प्रवासी, बेस्टचे चालक वाहक, प्रवासी लिंक रोड येथील मेट्रो प्रकल्पात काम करणारे मजूर, पादचारी यांना करत आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात उपक्राम राबविणार्या कार्यकर्त्यांचे कौतुक परिसरात होत आहे.
भर उन्हात उभे राहून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देणार्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, असे फारूक सय्यद या प्रवाशाने सांगितले.