मुंबई : गुंदवली – कापूरबावडी – भांडुप या जलबोगद्यात कापूरबावडी व भांडुप संकुल येथे झडपा बसविण्याचे काम महापालिका सुरू करणार आहे. त्यामुळे शनिवार, २५ मार्च ते ८ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत मुंबईतील काही भागांत १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. शहर विभागातील ए, सी, डी, जी/दक्षिण,जी/उत्तर या विभागात तसेच पश्चिम उपनगरातील सर्व विभागात (वांद्रे ते दहिसर) आणि पूर्व उपनगरातील एल, एन व एस विभागात ही कपात करण्यात येईल.
खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपातीच्या कालावधीत पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.