मुंबई : मुंबई महापालिकेमार्फत भांडुप संकुल येथील उदंचन केंद्रात १२०० मि.मी. व्यासाची बटरफ्लाय झडप बदलण्याचे काम केले जाणार आहे. हे काम मंगळवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत होणार आहे. या कालावधीत शहरातील ए, सी, डी, जी/दक्षिण,जी/उत्तर या विभागात आणि पश्चिम उपनगरातील सर्व विभागात (वांद्रे ते दहिसर) २० टक्के पाणी कपात करण्यात येईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
या परिसरामधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करावा व पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन प्रशासने केले आहे.