मुंबई, विशेष प्रतिनिधी:- भांडूप येथील तानसाची जुनी जलवाहिनी बदलून नवीन टाकण्यात येणार आहे. गुुुरुवारी ९ डिसेंबरला हे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एस विभागात गुुरुवार आणि शुुुकवार हे दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. तर के पूर्व, एच पूर्व, एल आणि जी उत्तर विभागात कमी दाबाने पुरवठा करण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणू नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा, तसेच पाणी जपून वावरावे, असे आवाहन जलविभागाने केले आहे.
मुंबईला नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका जल अभियंता व पाणीपुरवठा प्रकल्प खाते अहोरात्र झटत असतात. जुन्या व कालबाह्य होणाऱ्या जलवाहिन्या बदलविण्याचे काम वेळोवेळी आवश्यकतेनुसार हाती घेतले जाते. तसेच नवीन जलवाहिनी कार्यान्वित करताना गरजेनुसार योग्य त्या आकाराची असेल याचीही काळजी घेतली जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने जलवाहिनी दुरुस्ती व बदलाचे कामे करण्यात येतात. या अंतर्गत येत्या ९ व १० डिसेंबर २०२० रोजी सुमारे ४ किलोमीटर लांबीची व १८०० मिलीमीटर व्यासाची ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनी बदलविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यावेळी जुन्या जलवाहिनीच्या जागी नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. ही २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी असेल. या कामासाठी पालिकेच्या ‘एस’ विभाग क्षेत्रातील काही परिसरांत ९ व १० डिसेंबर २०२० रोजी पाणीपुरवठा होणार नाही. तर याच २ दिवशी ‘के पूर्व’, ‘एच पूर्व’, ‘एल’ व ‘जी उत्तर’ या ४ विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन आदल्या दिवशी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी बदलविण्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
९ डिसेंबर रोजी ‘एस’ विभागातील पाणीपुरवठा न होणारा परिसर
(दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत)
डक लाईन (खिंडीपाडा पंप क्षेत्र एस एक्स – १५) – दु. ०२.०० ते सायं. ०६.०० वाजेपर्यंत राजाराम वाडी, श्रीराम पाडा (ट्रंक मेन डायरेक्ट सप्लाय एस एक्स -०७) – पहाटे ०५.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत,
खिंडीपाडा (ट्रंक मेन डायरेक्ट सप्लाय एस एक्स -०७) – पहाटे ०५.०० ते सायं. ०५.०० वा. पर्यंत
टेंभीपाडा, सोनापुर, तुलशेतपाडा, प्रताप नगर, जमिल नगर, समर्थ नगर, सुभाष नगर, द्राक्षबाग, उत्कर्ष नगर, राजदीप नगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, (भांडूप पश्चिम क्षेत्र, टेंभीपाडा पोलिस चौकी एस एक्स ०३) – पहाटे ०५.०० ते स. १०.०० वाजेपर्यंत
जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा (फिल्टरपाडा एस एक्स-०६) – स. १० ते दुस-या दिवशी स. १० असे २४ तास
आंब्याची भरणी, रावते कंपाऊंड, राम नगर (ट्रंक मेन डायरेक्ट सप्लाय एस एक्स-०७) – स. १० ते दुस-या दिवशी स. १० असे २४ तास पासपोली गाव, मोरारजी नगर (मोरारजी नगर, पासपोली गाव, दरगाह एस एक्स-०५) – स. १० ते दुस-या दिवशी स. १० असे २४ तास
गांवदेवी टेकडी, सर्वोदय नगर (एस एक्स-१०) – दु. ०१.०० ते दुस-या दिवशी स. ०९.३० वाजेपर्यंत
..
‘के पूर्व’ विभागातील या भागात होणार कमी दाबाने पाणीपुरवठा
(दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत)
चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर, (मरोळ बस बार क्षेत्र, केई-०१) दु. २.०० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत तसेच उंच भागात परिणाम होईल.
कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत, (साहर रोड क्षेत्र, केई-०१) – दु. २.०० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत तसेच उंच भागात परिणाम होईल.
ओम नगर, क्रांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक परिसर) सहार गाव, सुतार पाखाडी (पाईपलाईन परिसर) (ओम नगर परिसर, केई-०२) – पहाटे ५.०० ते स. ८.०० पर्यंत
विजय नगर मरोळ परिसर, (केई-१०ए) – सायं. ६.०० ते रात्री १०.०० पर्यंत
सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर – २४ तास या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
..
‘एच पूर्व’ विभागात दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत* वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा
..
एल’ विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणा-या परिसरांची नांवेः
(दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत)
कुर्ला उत्तर परिसर, बरेली मस्जिद, ९० फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरी-मरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गा लगतचा परिसर, सत्य नगर पाईपलाईन – पहाटे ०५.०० ते दु. २.०० वाजेपर्यंत तसेच उंच भागात परिणाम होईल.
..
‘जी उत्तर’ विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणा-या परिसरांची नांवेः*
(दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत)
धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा (सायं. ४.०० ते रात्री ९.०० वा.) परिसर – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग
धारावी सकाळचा पाणीपुरवठा (पहाटे ०४.०० ते दुपारी १२.००) परिसर – प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.