
प्रशांत यादव यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
चिपळूण : अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाच्या शॉपीचा आज सकाळी चिपळूण शहरातील खेंड परिसरात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते या शॉपीचे उद्घाटन करण्यात आले. वाशिष्ठी डेअरीची शहरातील ही 18 वी शॉपी असून, वाशिष्ठी डेअरीच्या आता एकूण 72 शॉपी झाल्या आहेत.
यावेळी शॉपीचालक सार्थक रेडीज आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रशांत यादव यांच्यासह इतर मान्यवरांनी नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रेडीज कुटुंबियांच्या वतीने श्री. यादव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या उद्घाटन समारंभाला जगदीशशेठ रेडीज, प्रवीणशेठ रेडीज, नथुराम रेडीज, विजयशेठ रेडीज, अप्पा रेडीज, मानस जागुष्टे, अण्णा पाथरे, साई रेडीज, आदित्य चव्हाण, दिनेश पटवर्धन, तुषार रेडीज, सचिन रेडीज, स्मित रेडीज, सौरभ रेडीज, बच्चू रेडीज, सुनील टाकळे, सिद्धराज दळी, राजाशेठ दळी, श्री. ओसवालशेठ, अमरेश रेडीज, आदित्य पेडणेकर, राकेश दाते, पत्रकार महेंद्र कासेकर, निलेश कदम, वाशिष्ठी डेअरीचे मार्केटिंग एरिया सेल्स मॅनेजर तानाजी निंबाळकर आदी उपस्थित होते.
या शॉपीमध्ये वाशिष्ठी डेअरीच्या दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध, बासुंदी आणि पेढा तसेच वेगवेगळ्या चवदार फ्लेव्हर्समधील आईस्क्रिम विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.















