रत्नागिरी, प्रतिनिधी : आर्टिक्ट महासागरात आढळणाऱ्या वालरस या दुर्मिळ प्राण्याच्या दातांची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभाने मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथे अटक केली आहे. त्यांच्याकडून वालरसचे दात , वाहतूकीसाठी वापरण्यात आलेली कार वन विभागाच्या पथकाने जप्त केली आहे. दुर्मिळ असलेले वालरसचे दात या तिघांना नेमके कोठून मिळाले. ते त्यांची विक्री कुठे करणार होते ? याचा शोध वन विभाग घेत आहे. तर वालरसच्या दातांची किंमती जागतिक बाजारपेठेत मोठी आहे.
परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती प्रियंका लगड यांना त्यांच्या खास खबऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिघे वालरस या दुर्मिळ प्राण्याच्या दातांची तस्करी करणार असल्याचे समजले होते . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मदतीने सापळा लावण्यात आला होता. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार पथकाने अडवून गाडीची झडती घेतली . यावेळी गाडीत वालरस या दुर्मिळ प्राण्याचे दात आढळून आले . त्यानंतर वन व पोलीसांच्या पथकाने श्री . मुहमंद नुमान यासिन नाईक ( रा . गोवा , वय ४२ ) , श्री . हेमंत सुरेश कांडर ( रा . बावशी ता . कणकवली जि.सिंधुदूर्ग वय ३८ ) , श्री . राजन दयाळ पांगे रा . पारवाडी आचरे ता . मालवण जि . सिंधुदूर्ग वय ५८ ) या तिघांना अटक करण्यात आले आहे. तिघांविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १ ९ ७२ अन्वये , गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) , कोल्हापूर डॉ . व्ही . क्लेमेंट बेन , जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग , विभागीय वन अधिकारी श्री . दिपक खाडे , सहा . वनसंरक्षक श्री . सचिन निलख व पोलिस निरिक्षक श्री . हेमंतकुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती प्रियंका लगड , वनक्षेत्रपाल फिरते पथक रत्नागिरी ( चिपळूण ) श्री . राजेंद्र पाटील , वनक्षेत्रपाल फिरते पथक सातारा श्री . सचिन नानासाहेब डोंबाळे , वनपाल लांजा श्री . दिलीप आरेकर , वनपाल पाली श्री . गौतम कांबळे , वनरक्षक श्री . सागर पताडे , वनरक्षक संजय रणधिर , वनरक्षक आकाश कडूकर , वनरक्षक राहूल गुंठे , वनरक्षक राजाराम पाटील , वनरक्षक श्री.विक्रम कुंभार , वनरक्षक सुरज तेली , तसेच पोलीस हे.कॉ. प्रशांत बोरकर , पोलीस हे.कॉ.शांताराम झोरे , पोलीस हे.कॉ. बाळू पालकर , हवालदार हाईड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो श्री . विजय नांदेकर , मानद वन्यजीव रक्षक सातारा श्री . रोहन भाटये यांनी हि कामगिरी केली.