मुंबई, (निसार अली) : मालाड पश्चिमेतील राठोडी गावातील चेरीश स्टुडिओजवळील बोरजीस हाऊसची संरक्षण भिंत सकाळी 7.30 ते 8 वाजताच्या दरम्यान कोसळली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. पोलीस अग्निशमन दल व पालिकाप्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. भिंत जुनी असल्याने पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वी मालाड पूर्वेतील पिंपरी पाडा येथे भिंत कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. त्यात 25 निर्दोष नागरिकांचा बळी गेला होता.
अनेक नागरिक जखमी झाले होते. त्या नंतर मालाड पश्चिमेतील एव्हरशाईन नगर येथे पालिकेच्या कोंडवड्याची संरक्षण भिंत खचून पडली होती. कोणी ही जखमी झाले नव्हते. अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.