नवी दिल्ली : प्रसारमाध्यमांनी निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या कामगिरीबद्दल वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, ज्यामुळे जनतेला निवडणुकीच्यावेळी माहितीपूर्ण निवड करणे शक्य होईल, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.
ते आज नवी दिल्लीत पहिले ‘अटल बिहारी स्मृती व्याख्यान’ देतांना बोलत होते. ज्ञानी मतदार निर्मितीत प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावर बोलतांना उपराष्ट्रपती म्हणाले की, जर माध्यमांनी पदांच्या कामगिरीचा अहवाल प्रसिद्ध केला तर लोक या पक्षांकडून त्यांची आश्वासने, साधनसंपत्ती उभी करणे आणि त्यांचा विनियोग कसा करणार आहेत या विषयीचे उत्तरदायित्व मागू शकतात. आपला देश केवळ जगातही सर्वात मोठी लोकशाही म्हणूनच नाही तर सर्वात सळसळती, स्वच्छ लोकशाही म्हणून मिरवू शकेल, असेही ते म्हणाले.
माध्यमांनी सच्चेपणा दर्शवणारा आरसा म्हणून कार्य केले पाहिजे. वस्तुस्थितीला वाढवून अथवा कमी दाखवू नये असे ते म्हणाले. ‘पेड न्यूज’ बद्दल वाटणारी चिंता व्यक्त करून ते म्हणाले की, माध्यमांनी पेड न्यूज टाळावी.
माध्यमांनी मुद्दे आणि आव्हाने यांचे विश्लेषण करावे असेही त्यांनी सुचवले.