–सुरक्षित अंतर राखून रिचार्जची सुविधा देणारा या क्षेत्रातील पहिलाच उपक्रम
-ग्राहक तसेच रिटेलर्सच्या सुरक्षेची खबरदारी
मुंबई, 14 मे : व्होडाफोन आयडियाने आपल्या रिटेल दालनांमध्ये ग्राहक व रिटेलर्समध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करत संपर्कविरहीत रिचार्ज सेवा उपलब्ध केली असून ही सेवा या क्षेत्रात पहिल्यांदाच लाँच करण्यात आली आहे. हे व्होडाफोन आडियाच्या स्मार्ट कनेक्ट रिटेलर अपमुळे शक्य झाले असून त्यामध्ये रिटेलर्सना रिचार्ज करण्यासाठी मोबाइल क्रमांक एंटर करण्यासाठी ग्राहकाच्या हातात फोन देण्याची गरज पडत नाही. ग्राहक किंवा रिटेलरला उपकरणावर दहा आकडी मोबाइल क्रमांक सांगावा लागणार आहे व गुगल व्हॉइस सुविधा दहा फूट अंतरावरून आलेल्या या आवाजी आदेशाची नोंद घेते.
जेव्हा ग्राहक रिचार्ज करण्यासाठी रिटेलरकडे जातो तेव्हा रिटेलर बहुतेक वेळेस त्याचा फोन (स्मार्ट कनेक्ट रिटेलर अप सुरू करून) ग्राहका हातात देऊन मोबाइल क्रमांक टाइप करण्यास सांगतात. मोबाइल क्रमांक अचूकपणे दिला जावा यासाठी असे केले जाते. मात्र, सध्याच्या सुरक्षित अंतर राखण्याच्या काळात हा पर्याय व्यवहार्य राहिलेला नाही.
देशभरातील ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील रिटेल दालने सुरू होत असल्यामुळे व्होडाफोन आयडिया आपल्या सर्व दालनांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचे कसून पालन करत आहे. संपर्कविरहीत रिचार्ज सुविधा देण्यासाठी स्मार्ट कनेक्टमध्ये आवाजावर आधारित रिचार्ज सुविधा समाविष्ट करण्यात आली असून ही सुविधा व्होडाफोन आयडियाची स्वतःची दालने तसेच मल्टी- ब्रँडेड दालनांमध्येही उपल्बध आहे. ग्राहकांना त्यांचा मोबाइल क्रमांक मोठ्याने बोलावा लागेल आणि त्याची नोंद घेतली जाईल व तसे रिचार्ज टबमध्ये दिसून येईल. त्यापुढील प्रक्रिया नेहमीप्रमाणे पार पडेल.
नव्या आवाजावर आधारित संपर्कविरहीत उपक्रमाविषयी व्होडाफोन आयडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश जैन म्हणाले, ‘ग्राहकाभिमुक दूरसंचार कंपनी या नात्याने आम्ही सातत्याने काळाशी सुसंगत उत्पादने उपलब्ध करून देतो आणि ग्राहक कायम कनेक्टेड राहातील याची काळजी घेतो. डिजिटल सेवेला प्राधान्य देत कंपनीच्या 300 दशलक्ष ग्राहकांना सोयीस्कर आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी आम्ही आमच्या प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटायझेशन करत आहोत. या क्षेत्रात पहिल्यांदाच संपर्कविरहीत रिचार्ज सेवा लाँच केली आहे, ज्यामध्ये स्पर्श न करता रिचार्ज करणे शक्य होते आणि म्हणूनच सध्याच्या सुरक्षित अंतर राखण्याच्या काळात सुरक्षित राहाण्यासाठी ही सेवा अतिशय गरजेची आहे.’
सध्या आवाजावर आधारित ही सेवा इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये उपलब्ध असून त्यात वेगवेगळ्या प्रकारे मोबाइल क्रमांक स्वीकारला जातो. ही सेवा टप्प्याटप्प्याने इतर भाषांमध्ये सुरू केली जाईल.
काही काळापूर्वीच कंपनीने आपले संकेतस्थळ आणि व्हॉट्स अपवर एआय पॉवर्ड बीओटी सेवा लाँच केली होती. व्होडाफोन आयडियाने ग्राहकांना घरीच सुरक्षित राहून डिजिटल रिचार्ज करता यावे यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे.