२९ जुलै, २०२१: सार्वजनिक आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करणे आणि कोणत्याही असंभावित परिस्थितीसाठी कायम तयार असणे किती गरजेचे आहे याची जाणीव या महामारीने आपल्याला करून दिली आहे. देश कोविडविरोधात लढत असताना पायाभूत आरोग्यसेवा-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सरकार, कॉर्पोरेट्स, समाज आणि व्यक्ती यांनी आपापल्या परीने योगदान दिले आहे.
हे संकट अद्याप देखील दूर झालेले नाही आणि या संदर्भात अजून बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. भविष्यासाठी सदैव सज्ज राहणे अत्यंत आवश्यक आहे. कसोटीचा काळ कधीही निर्माण झाला तर आपल्याला त्याला यशस्वीपणे सामोरे जात यावे यासाठी वोडाफोन आयडिया फौंडेशन ने पुढाकार घेऊन भारतातील अनेक शहरांमध्ये पायाभूत आरोग्यसेवासुविधा बळकट करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा एक भाग म्हणून वीने मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, नवी दिल्ली या व इतर अनेक शहरांमधील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण वैद्यकीय उपकरणांचे वाटप केले आहे.
वोडाफोन आयडिया फौंडेशन ने वितरित केलेल्या महत्त्वपूर्ण वैद्यकीय साधनांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर्स (२००), ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स (१००), व्हेन्टिलेटर्स (५०), आयसीयू बेड्स (१८), पोर्टेबल एक्सरे मशिन्स (९) आणि इन्फ्युजन पंप्स (१३) यांचा समावेश असून सोला सिविल हॉस्पिटल, अहमदाबाद, होली फॅमिली हॉस्पिटल, नवी दिल्ली, केईएम हॉस्पिटल, पुणे, डॉ आर एन कूपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल, मुंबई, बोरिंग अँड लेडी करझन हॉस्पिटल्स, बेंगुळुरु या हॉस्पिटल्सना ही मदत पुरवली गेली आहे.
वैद्यकीय उपकरणे पुरवण्याबरोबरीनेच वोडाफोन आयडिया फौंडेशन टीमने या सर्व साधनांचा योग्य उपयोग आणि देखरेख करता यावी यासाठी मशीन ऑपरेटर्सना प्रशिक्षण व साहाय्य देखील उपलब्ध करवून दिले आहे.
समाजकल्याणासाठी वी वचनबद्ध आहे आणि उज्वल भवितव्य निर्माण करण्यासाठी समुदायांचा विकास करण्यात सातत्याने पाठिंबा देत राहील.















