
रत्नागिरी : आज जिल्ह्यात राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद शाळा वांझोळे भोईवाडीच्या तीन नवीन वर्गखोल्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, राजेंद्र महाडिक, जि.प. सदस्या मुग्धा जागुष्टे, संगमेश्वर पंचायत समिती उपसभापती अजित गवाणकर, माजी आमदार सुभाष बने, जि.प. सदस्य रोहन बने, सरपंच दत्ताराम धाडवे,तहसिलदार संदीप कदम, संगमेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका जोगविलकर आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे येथील मुख्य रस्ता ते सनगलेवाडी रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. सदरचा रस्ता 5.64 कि.मी चा असून बांधण्यासाठी अंदाजित 3 कोटी 36 लाख रुपये खर्च येणार आहे.
पालकमंत्र्याच्या हस्ते विशेष घटक साकव योजनेतंर्गत निवे खुर्द बौध्दवाडीकडे जाण्यासाठी निंबेरा नदीवर लहान पुलाचे भूमिपूजन, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा निवे खुर्द परबवाडी व बेलारी कनावजेवाडी अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. निवेखुर्द परबवाडी नवीन वर्गखोली बांधणे कामाचे उदघाटन व तामनाळे जोडरस्ता लहान पुलाचे उद्घाटनही पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले.
साखरपा गुरववाडी बोंडे मारळ रस्ता
आंगवली गाव व बोंड्ये गाव दरम्याने बावनदीवर पुलाचे उद्घाटन
साखरपा गुरववाडी बोंडे मारळ रस्ता आंगवली गाव व बोंड्ये गाव दरम्याने बावनदीवर पुलाचे उद्घाटन पालकमंत्र्याच्या हस्ते झाले. यावेळी यावेळी आमदार सदानंद चव्हाण, राजेंद्र महाडिक, जि.प. सदस्या मुग्धा जागुष्टे, संगमेश्वर पंचायत समिती उपसभापती अजित गवाणकर, माजी आमदार सुभाष बने, जि.प. सदस्य रोहन बने, तहसिलदार संदीप कदम, संगमेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. जाधव, आदी उपस्थित होते.
















