गुरुवारी सांयकाळी काम आटोपून ऑफिसमधून घरी निघालेले महापालिकेचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी विवेक रवाळे हे पूल दुर्घटनेत थोडक्यात बचावले. ‘हिमालय’ पुलाजवळ गाडी आली असता गाडीवर मोठा दगड मारावा तसा आवाज झाला. त्यामुळे वाहनचालका गाडी पुढे घेण्यास सांगितले. थोडा पुढे जाताच धाडकन आवाज झाला. त्यांचा आवाज एकून एकच थरकाप उडाला. मागे वळून पाहतात तर ब्रीजचा भाग कोसळून अनेक प्रवासी त्याखाली सापडल्याने मोठा आवाज आणि पळापळ झाल्याचे त्यांना दिसले. काही क्षणांसाठी ते या मोठ्या दुर्घटनेतूनवाचले. मात्र, स्वत: बचावकार्यात सहभागी होऊन जखमींनाही रुग्णालयात नेण्यासाठी मदतही केली. वाहन चालक संजय कांबळे आणि गणेश सावर्डेकर यांनीही मदतीस पुढाकार घेतला होता.
विवेक रवाळे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, मुंबई महापालिका