मुंबई : आषाढी एकादशी निमित्त वडाळा येथील प्रतिपंढरपूर समजल्या जाणऱ्या श्री विठ्ठल मंदिरात मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सपत्नीक विठ्ठलाचे दर्शन घेतले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून येथे दिंडींचे आगमन झाले होते. यावेळी तावडे यांनी वारकऱ्यांसोबत टाळ-मृदुंगाच्या गजरात ठेका धरत विठ्ठल नामाचा जयघोष केला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने तावडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.