मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) : कुणबी सहकारी बँक ली.मुंबई अध्यक्ष सीए विठ्ठल धों. चिविलकर यांची बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालक सदस्यपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली.कुणबी बँक संचालक मंडळाच्यावतीने चिविलकर यांचा उपाध्यक्ष श्री. ना. बा. गोरीवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालक, कार्य.संचालक, सीईओ आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते.