
रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण रेल्वे मार्गावरील जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडलेल्या व्हिस्टाडोम अर्थातच काच असलेला पारदर्शक रेल्वे डब्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या डब्यातून १३२० प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
१८ सप्टेंबरपासून व्हिस्टाडोम अर्थात काच असलेला पारदर्शक डबा जनशताब्दी एक्सप्रेसला जोडण्यात आला. केवळ दोन महिन्यात या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. दोन महिन्यात या डब्यातून कोकण रेल्वेला २१ लाखाहून अधिक उत्पन्न मिळालं आहे. चाळीस आसने असलेल्या या पारदर्शक डब्यात मोठ्या खिडक्या, एलसीडी आणि निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या डब्याची बांधणी चेन्नईत करण्यात आली आहे. सेवा सुरु झाल्यापासून या डब्याच्या एकुण क्षमतेचा विचार करता ८७ टक्के इतका प्रतिसाद मिळाला.