मुंबई, (निसार अली) : नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान कोस्टल रोड बांधण्यासाठी विशेष प्रकल्प कायदा तयार करण्याच्या सूचना मंञालयातील अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. या कायद्याला महाराष्ट्र मच्छिमार संघटनेने तीव्र विरोध असेल, असे संघटनेचे अध्यक्ष महेश तांडेल यांनी सांगितले.
विशेष प्रकल्प कायदा तयार झाल्यास कोस्टल रोड बांधताना मुंबईतील किनारपट्टीवरील कोळीवाडे व मच्छीमार समाजाच्या वसाहती हटविणे शासनाला सहज शक्य होईल, म्हणून हा कायदा तयार केला आहे, असा आरोप तांडेल यांनी केला आहे. कायदा तयार झाल्यास महाराष्ट्र मच्छिमार संघटना पावसाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.