Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे श्री गणेशोत्सव – २०२१ ची तयारी सर्वत्र करण्यात येत आहे. या अनुषंगाने स्थापत्य समिती (उपनगरे) चे अध्यक्ष श्री. स्वप्निल टेंबवलकर, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजराजेश्वरी रेडकर तसेच एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षा श्रीमती दिपमाला बढे, नगरसेविका श्रीमती चंद्रावती मोरे यांनी एस विभागातील भांडुप येथील गणेशघाट, पवई तलाव व भांडुपेश्वर कुंड तसेच टी विभागातील मुलुंड येथील मोरया उद्यान तलाव या गणेशमूर्ती विसर्जन तलावांची (दिनांक ९ सप्टेंबर २०२१) सकाळी पाहणी केली.
यावेळी उप आयुक्त (परिमंडळ ६) श्री. देवीदास क्षीरसागर, टी विभागाचे सहायक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले, एस विभागाचे सहायक आयुक्त श्री. अजितकुमार आंबी यांच्यासह एस आणि टी विभागातील अधिकारी उपस्थित होते.













