मालाड, ता.11(निसार अली) : ‘विसर्जन आपल्या दारी’ या मुंबई महानगर पालिकेच्या संकल्पनेला पी / उत्तरविभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेश भक्तांनी घरगुती गणपती विसर्जन यावेळी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षांपासून पालिकेने ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना राबवली आहे. ट्रक किंवा मोठ्या वाहनांवर मोठ्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटात भाविकांची गर्दी जास्त होऊ नये तसेच सण आनंदाने साजरा करताना कोणत्याही प्रकारे नियमभंग होऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने निर्मिती केलेले ट्रक इमारतीच्या प्रवेशद्वारा वर पोहचतात, तिथं नागरिक घरगुती मूर्त्यांचे विसर्जन करत तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ही मदत करतात, अशी माहिती पालिका अधिकारी संतोष दळवींनी दिली.















