
यावेळी प्रियांका मॅडम यांनी नशाबंदी मंडळाच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि उपस्थितांना मशेरी, तंबाखू, सुपारी, टीव्ही सीरिअल्स, याचे व्यसन करू नका “आजचा दिवस नाही म्हणा “असा मंत्र दिला. वाचन, लेखन, वेगवेगळे छंद जोपासा. तसेच संविधानातील “कलम ४७” बद्दल माहिती देऊन व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. ॲड. सुवर्णा यांनी महिलांच्या अधिकार, अत्याचार आणि इतर समस्यां यावर वक्तव्य करून येणाऱ्या दिवसांमध्ये कायद्याविषयी जनजागृतीचे शिबीर घेऊन महिलांना इतर महिलांच्या जनजागृतीसाठी तयार करू असे आश्वासन दिले. कुसुमताई यांनी बचत गटा संदर्भात माहिती दिली. शोभा मॅडम यांनी विरांगणा प्रतिष्ठानच्या सर्व उपस्थित महिलांचे आभार मानले आणि उपस्थित मान्यवरासह स्वत:चा परिचय देऊन महिलांनी प्रत्येक छोट्या छोट्या व्यवसायातून कसे आत्मनिर्भर व्हावे आणि आपल्या मुलींना शिक्षित करून सक्षम करावे याबाबत मार्गदर्शन केले त्याचबरोबर तरुणींना निर्व्यसनी जोडीदार निवडा असे आवाहन केले. गणेश कदम यांनी छोटे छोटे उद्योग कसे सुरू करता येतील आणि नगरसेविका संगीता हांडोरे यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते विरांगणा द्वारे शासनमान्य चालवण्यात येणाऱ्या टेलरिंग, ब्युटी, मेहंदी क्लासेस पूर्ण केलेल्या महिला आणि तरुणींना प्रमाणपत्र देण्यात आले. येणाऱ्या आगामी निवडणुकीत त्यांना चौथ्यांदा या विभागातून निवडून देण्यात यावे अशी आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या निमित्त अतिथिंचे स्वागत लहानमुलींनी नृत्याद्वारे केले. काजलताई यांनी कविता सादर करून उपस्थित महिलांचे मनोरंजन करून कार्यक्रमास रंगत आणली. शेवटी उपस्थित तरुणींनी व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस याचे औचित्य साधून “सुखी संसारासाठी, मज जोडीदार निर्व्यसनी हवा” असा नारा देऊन व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी नागरिकांना आव्हाहन केले.
विरांगणा महिला औद्योगिक प्रतिष्ठानच्या शोभाताई आणि काजलताई यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे महिलांना मार्गदर्शन, उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार मानले. ५० महिलांच्या उपस्थितीत हा समारंभ उत्साहात साजरा झाला.