रत्नागिरी, (आरकेजी) : शेतकरी संपाच्या माध्यमातून विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. रत्नागिरी दौर्यावर आले असता ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी फडणवीस सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी चर्चेसाठी पुढे यावे. असे आवाहन तावडे यांनी केले. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकार विरोधात केलेल्या टिकेलाही तावडे यांनी उत्तर दिले.