मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी वडाळा येथील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा केली.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरातील वारकरी मंडळींच्या भजनामध्येही तावडे यांनी विठूनामाचा गजर केला आणि या भजनी मंडळाबरोबर विठ्ठलाच्या सेवेत अभंगाचे गायन केले. यावेळी श्री. तावडे यांनी महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेच्या सुखसमृद्धीसाठी व आरोग्यासाठी विठूरायांकडे साकडे घातले.