पुणे : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सकाळी जेजूरी येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत जेजूरी ते वाल्हे वारकऱ्यांसमवेत विठूनामाचा गजर करीत सहभागी झाले. यावेळी पालखीच्या दिंडी प्रमुखांशी तावडे यांनी संवाद साधला. तसेच वारकऱ्यांसमवेत टाळ हाती घेत भजनामध्येही ते रममाण झाले.