रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सवेणी मोहल्ला येथील एका विवाहित तरुणाच्या विरोधात खेड पोलिसात पोक्सोखाली गुन्हा दाखल झाला आहे. वसीम तैय्यब कावळेकर असे या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सुकदर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थींनीशी गैरवर्तन करणारा शिक्षक पोक्सो कायद्याखाली गजाआड झालेला असतानाच, आणखी एका विवाहित तरुणाला पोक्सोखाली अटक करण्यात आली. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सवेणी मोहल्ला येथे राहणाऱ्या एका अलवयीन युवतीचा त्याच गावातील वसीम कावळेकर यांने विनयभंग केला होता. तिच्या नातेवाईकांना याबाबत खबर मिळाल्यावर त्यांनी खेड पोलिसात वसीम याच्या विरोधात तक्रार दाखल केली. खेड पोलिसांनी वसीम याच्या विरोधात पोक्सोखाली गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक खेड पोलीस तपास करत आहेत.