रत्नागिरी (आरकेजी): बाप एकाबाजूला मुलगा एका बाजूला अशा पक्षाचा काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राणे यांनी रविवारी नवीन पक्ष स्थापन केला. यावेळी राणे यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. त्यांच्या या टीकेला खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत प्रत्युत्तर दिले.
शिवसेना प्रमुखांवरच्या आरोपाला राऊत यांनी चोख उत्तर दिलं आहे. भाडगिरी करण्याचं काम नारायण राणे यांनी केले आहे. त्यामुळे राणेंना शिवसेना काडीचीही किंमत देत नाही, असे राऊत म्हणाले. तसेच राणे हे लाचार असून त्यांच्यासारखी लाचारी शिवसेनेनी कधी केलेली नाही. त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष कसा चालेलं याची काळजी करावी. त्यांचा पक्ष किती दिवस टिकतो, किती दिवस चालवतात हे शिवसेना पाहणार आहे. आम्हाला राणे हे शत्रू वाटतच नाही कारण ते किड्या मुंग्यासारखे आहेत असा घणाघात राऊत यांनी करत नारायण राणेंच्या नव्या पक्ष घोषणेतील भाषणात शिवसेनेवर केलेले आरोपांचा खरपूस समाचार घेतला.