रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत शनिवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना-भाजप, रिपाई (आ), रासप (जा) या महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अखेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे अखेर मनोमिलन झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे शनिवारी खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दुपारी साडेबारा वाजता जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाईण्यात येणार आहे. दरम्यान त्या अगोदर हॉटेल विवेक येथील मराठा मैदानात सकाळी 11वा. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महामेळावा होणार आहे. या मेळाव्याला शिवनेता नेते सुभाष देसाई रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री दिपक केसरकर, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडेले, शिवसेना उपनेते- म्हाडा अध्यक्ष, आमदार उदय सामंत, भाजपा नेते आमदार प्रसाद लाड, आरपीआय नेते के. डी. कदम, प्रांतिक सदस्य प्रदिप जाधव, कार्याध्यक्ष विलास कदम, तालुकाध्यक्ष विलास कांबळे, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, राजापूर विधानसभेचे आमदार राजन साळवी, कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मराठा मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हे उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे भरणार आहेत.