रत्नागिरी (आरकेजी): नारायण राणेंची परिस्थिती ना घर का ना घाट का, अशी झाली आहे, खरमखरीत टीका शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
काँग्रेसमधून बाहेर पडत नारायण राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यानंतर एनडीएला पाठींबा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे राणेंना राज्यात मंत्रिपद मिळणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. स्वार्थापोटीच नारायण राणेंनी काँग्रेस सोडली. राणेंना भाजप मंत्रिमंडळात घेणार नाही. तसेच ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी भाजपच्या जवळ जाण्याचा राणेंचा प्रयत्न आहे, असा आरोप राऊत यांनी केली.
अन्यथा शिवसेना स्टाईल
दोन दिवसात मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डयांमुळे या महामार्गावरून प्रवास करणे अतिशय धोकादायक झालं आहे.