मुंबई: गोदरेज समूहाच्या या मुख्य कंपनी तर्फे “ विक्रोली क्युचीना “ फूड रायटर, गॅस्ट्रोनोम व कन्सल्टंट रुशिना मुनशॉ-घिल्डियाल यांच्या सहयोगाने पहिल्या कलिनरी क्रोनिक्लर्स कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे.या विशेष उपक्रमामध्ये, कला, साहित्य, मीडिया व फोटोग्राफी या माधम्यातून क्युझेन व कलनिरी आर्ट्स यांचे संकलन करण्याच्या कलेमध्ये कार्यरत असलेले ३०० सर्जनशील प्रोफेशनल एकत्र येणार आहेत. त्यामध्ये या क्षेत्रांतील नामवंत तज्ज्ञांची विविध विषयांवरील भाषणे, चर्चा, व्याख्याने, मास्टरक्लास व स्पर्धा यांचाही समावेश असणार आहे.भास्कर रमेश, अंकित गुलाबानी, अँटोनी लेविस, विक्रम डॉक्टर, मेरियम एच. रेशी, डॉ. मोहसिना मुकादम, रुची श्रीवास्तव, रुशिना मुनशॉ-घिल्डियाल, सई कोराणे-खांडेकर, साबा दाझियानी, सौरिश भट्टाचार्य, शेफ वरूण इनामदार, शेफ रणवीर ब्रार व वीर सिंघवी असे नावाजलेले तज्ज्ञखाद्यपदार्थांचे डॉक्युमेंटेशन करण्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्य याविषयी आपला दृष्टिकोन व्यक्त करणार आहेत. सर्जनशील प्रेरणा देण्यासाठी झेबा कोहली यांचे चॉकलेट इन्स्टॉलेशन अशा विशेष प्रदर्शने इन्स्टॉलेशनचाही कॉन्क्लेव्हमध्ये समावेश असेल.कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होण्यास इच्छुकांनी विद्यार्थी, डेलिगेट व मास्टरक्लास. या तीन श्रेणींसाठी नोंदणी करावी.