
विक्रोळी : स्वातंत्र्यलढ्यातील शूर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यासाठी आणि स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी विक्रोळी विधानसभेतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आझादी गौरव यात्रा काढली होती.
आज या रॅली मध्ये मुंबईतील ज्येष्ठ काँग्रेस नेत्या, आमदार आणि माजी मंत्री वर्षा ताई गायकवाड आणि हजारो काँग्रेस कार्यकर्ते आझादी गौरव यात्रेत सहभागी झाले, अशी माहिती काँग्रेस नेेेते राहुल वाघधरे यांनी दिली.

















